स्थापना - औरंगाबाद दि. १६/०४/१९८३
नोंदणी क्रमांक. महाराष्ट्र/ २७-८३

समाजशास्त्र विषयाच्या अध्ययनाची सुरवात २० व्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई विद्यापिठामध्ये होवून तद्नंतर संपूर्ण भारतभर विद्यापिठ व महाविद्यालयीन पातळीवर समाजशास्त्र विषय शिकविण्यात येवू लागला. महाराष्ट्रामध्ये सामाजिकशास्त्र विद्याशाखे अंतर्गत अत्यंत विद्यार्थीप्रिय विषय म्हणून समाजशास्त्राचा उल्लेख करता येतो.

महाराष्ट्रात पदवी व पदव्यूत्तर स्तरावरील शिक्षणासाठी मराठी माध्यमाचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या संदर्भून सकस अध्ययन सामूग्री पुरविण्याची गरज निर्माण झाली. ही गरज ओळखून तसेच समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून प्राध्यापक,संशोधक व विद्यार्थी यांचामध्ये विचारांचे आदान-प्रदान होण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर एक स्वतंत्र व्यासपिठाची गरज निर्माण झाली. यातूनच १९८१ मध्ये डॉ.एम.जी.कुलकर्णी यांनी विविध विद्यापिठातील समाजशास्त्राच्या अध्यापकांशी संपर्क साधून असे व्यासपिठ निर्माण करण्याविषयी विचार मांडला. यातूनच मराठी समाजशास्त्र परिषद आकाराला आली. मराठी समाजशास्त्र परिषदेला कायदेशीर दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार संस्था नोंदणी अधिनियम १८६० नुसार मराठी समाजशास्त्र परिषदेस नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले व दि. २७/६/१९८३ रोजी मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० प्रमाणे प्रमाणपत्र मिळाले.

मराठी समाजशास्त्र परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून एम.जी.कुलकर्णी परिषदेचे सचीव म्हणून डॉ.व्ही.व्ही.देशपांडे कोषाध्यक्ष म्हणून डॉ.सुधा काळदाते तर कार्यकारीणी सदस्य म्हणून डॉ.पू.ल.भांडारकर, डॉ.विलास संगवे, डॉ.वाय.बी.दामले, डॉ.धीरेंद्र नारायण, डॉ.वाळुंजकर, डॉ.शैलजा जोशी यांची निवड करण्यात आली.

विशेष महत्वाचे

समाजशास्त्र संशोधन पत्रिका - २०२२


नोटीस - वार्षिक आमसभा


परिसंवाद सुचना


नोटीस


व्यक्ती परिचय ग्रंथ


व्यक्ती परिचय ग्रंथ प्रकाशन सोहळा

May 16, 2021 12:00 PM

Join Zoom Meeting :
https://us02web.zoom.us/j/86122110810?pwd=SWVxT3d3aHF6M29lVXpXSGtqRGVtdz09

Meeting ID: 861 2211 0810
Passcode: mspmaha


संशोधन कार्यशाळेसाठी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार

मराठी समाजशास्त्र परिषदेतर्फे दि.२५ एप्रिल २०२१ रोजी एक दिवसीय "संशोधन कार्यशाळा " आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक अभ्यासक व संशोधक, प्राध्यापक यांनी आवर्जून उपस्थिती नोंदविली होती. या कार्यशाळेत मुंबई येथील प्रा. डॉ. अनघा तेंडुलकर यांनी "शोधनिबंध कसा लिहावा" तर नांदेड येथील प्रो.घनश्याम येळणे यांनी "संशोधन प्रबंधाची मांडणी" या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने झूम अँपवरून १०० अभ्यासक तर युट्युबवर ११८० अभ्यासक उपस्थित होते. ही उपस्थिती कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत होती हे विशेष. कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून ती किती यशस्वी झाली आहे हे कळते.आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळते.

महासोसिओलॉजी व्हाट्सअप ग्रुपसह अनेकांनी आम्हाला सहकार्य केले.

आपण या कार्यशाळेसाठी स. ९:५० वाजेपासून ते दुपारी १:४० वाजेपर्यंत उपस्थित राहिलात त्याबद्दल मराठी समाजशास्त्र परिषदेच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो.

कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर अनेकांनी मोबाईलवरून व मराठी समाजशास्त्र परिषदेच्या व्हाट्सअप ग्रुपवरून कार्यशाळेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्यामध्ये प्रामुख्याने प्रो.पी.जी. जोगदंड, डॉ. नारायण चौधरी, डॉ.बालाजी दमकोंडवार चंद्रपूर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण परभणी, प्रा.रामराव चव्हाण नलेगाव, डॉ. अलका सोमवंशी जळकोट, लातूर, डॉ. मंजुषा नळगिरकर, फ़ुलंब्री, डॉ. आरती धनवे औरंगाबाद, डॉ. सुशिला फुले औरंगाबाद, डॉ. नाना पाटील पालम, डॉ. राहुल भगत भंडारा, डॉ. राजेंद्र कांबळे नागपूर, प्रा.महेंद्र पट्टेकर माहूर, डॉ. संदीप गोरे वसमत,डॉ. राजाभाऊ नवगणकर सेनगाव, डॉ. एस.पी.ढोले हदगाव, डॉ.सुधीर येवले बीड, डॉ. रामेश्वर मोरे सोलापूर,डॉ. श्रीनिवास पिलगुलवार वरोरा,डॉ. बनकर सर अमरावती, डॉ. दहीकांबळे नांदेड,डॉ. अंजली जोशी लातूर , डॉ. शोभा इंगळे नांदेड, डॉ. चंद्रकांत कांबळे, सोलापूर , डॉ.पाटील उमरगा,डॉ. सुभाष वाघमारे उमरगा, सुमेध राजूरकर पुणे,डॉ. अर्चना जगतकर कोल्हापूर, कैलास आंबूलगेकर कोल्हापूर,डॉ.अनिल जैन वाशिम,डॉ.प्रदीप पाटील उमरगा.डॉ.सुनीता टेंगसे सोनपेठ जि. परभणी. यांच्यासह अजूनही प्रतिक्रियांचा ओघ येतच आहे. या सर्वांच्या प्रतिक्रिया म.स.प.च्या व्हाट्सएप ग्रुपवर वाचता येतील. त्यांच्याही प्रतिक्रिया सर्वांपर्यंत पोहचवू. भविष्यात होणाऱ्या उपक्रमासही आपण भरभरून प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे.

समाजशास्त्र विषयाच्या समृद्धीसाठी आपल्या काही कल्पना,योजना व उपक्रम असतील तेही आम्हाला सुचवावेत.

पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद !🙏
अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषद


एकदिवसीय संशोधन कार्यशाळा

Topic: Marathi Samajshastra Parishad's Workshop on Research Methodology

Date 25/04/2021
Time 10-00 AM to 1-30 PM

Join Zoom Meeting :
https://us02web.zoom.us/j/89249897501?pwd=bVhPdXFzeWRuTjFmY3NiclY5WGUwZz09

Meeting ID: 892 4989 7501
Passcode: msplatur


व्याख्यान

मराठी समाजशास्त्र परिषद द्वारा आयोजित "फुले शाहू आंबेडकर" व्याख्यानमालेत दि.१२ एप्रिल २०२१ रोजी प्रो.जगन कराडे (सचिव, इंडियन सोसिओलॉजिकल सोसायटी, दिल्ली) यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्याचा संक्षिप्त अहवाल आम्ही आज प्रकाशित करीत आहोत. अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषद

Document Link


विशेष आभार

मराठी समाजशास्त्र परिषद आयोजित "फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमाला"दि.११,१२,१३एप्रिल २०२१रोजी उत्स्फूर्तरीत्या ऑनलाईनवरून पार पडली.या व्याख्यानमालेसाठी आपण सर्वजण तीन दिवस ऑनलाईनवरून सातत्याने उपस्थित राहिलात,यामध्ये विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल ते म्हणजे समाजशास्त्र विषयाचे जेष्ट प्राध्यापक. त्यांच्या प्रति म.स.प.आदरपूर्वक आभार व्यक्त करते.या तीन दिवसीय व्याख्यानमालेत म.स.प.चे माजी अध्यक्ष व अध्यक्षा उपस्थित होते,या उपक्रमाबद्द्ल या सर्वांनी कौतुक केले. या व्याख्यानमालेतील वक्ते प्रा.डॉ.प्रदीप आगलावे,नागपूर, प्रा.डॉ.जगन कराडे, कोल्हापूर, प्राचार्या डॉ.मंजुश्री पवार,कोल्हापूर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली, या सर्वांबद्दल म.स.प.आभार व्यक्त करते.या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी समाजशास्त्र विषयाचे व इतर विषयाचे ही अनेक प्राध्यापक, प्राध्यापिका, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते,करीता म.स.प.आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते.फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमाला यशस्वीरीत्या पार पांडण्यासाठी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सल्लागार मंडळांनी विशेष प्रयत्न केले आहे.

अध्यक्ष

मराठी समाजशास्त्र परिषदमराठी संशोधन पत्रिका

मराठी समाजशास्त्र परिषदेच्या सर्व आजीवन सदस्यांना सूचित करण्यात येते की, मराठी समाजशास्त्र परिषदे तर्फे प्रकाशित करण्यात येणारी "मराठी संशोधन पत्रिका" दि.१४ एप्रिल २०२१ रोजी ठीक सकाळी १०:०० वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी प्रकाशित करीत आहोत. प्रस्तूत संशोधन पत्रिका मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वेबसाईट, मराठी समाजशास्त्र व्हाट्सएप, महासोसिओलॉजी व्हाट्सएप ग्रुप, व इतर काही व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे, तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सोबतच " संशोधन पत्रिका" देत आहोत.

संपादक,
कार्यकारी संपादक.


व्याख्यान विषयक सूचना

दिनांक 27/09/2020 रोजी सकाळी 11:00 वाजता मा. प्रा. डॉ. उत्तमरावजी भोईटे सर यांचे ''भारतीय समाजशास्त्राची पूर्वपीठिका, विकास आणि समस्या'' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.

मा. प्रा. उत्तम भोईटे सर यांचे संपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा


व्याख्यान विषयक सूचना

मराठी समाजशास्त्र परिषदेचे सर्व आजीवन सदस्य, समाजशास्त्रज्ञ, समाजशास्त्रावर विशेष प्रेम असलेले सर्व अभ्यासक व विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता, मुंबई विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ प्राध्यापक पी. जी. जोगदंड सर यांचे विशेष व्याख्यान "सामाजिक चळवळ संकल्पना आणि स्वरूप: दलित चळवळीच्या विशेष संदर्भात" यावर आयोजित केले आहे. तरी आपण सर्वांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरांचे लाईव्ह व्याख्यान खालील लिंकवर ऐकू शकतात.

प्राध्यापक पी. जी. जोगदंड सर यांचे संपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी या लिंक वर क्लिक कराअध्यक्षांचे मनोगत

       मराठी समाजशास्त्र परिषद च्या सर्व प्राध्यापकांना सस्नेह नमस्कार, महाराष्ट्रातील समाजशास्त्राच्या प्राध्यपकांना एकत्र आणण्याचा उद्देशाने एप्रिल १९८३ मध्ये औरंगाबाद येथे मराठी समाजशास्त्र परिषदे ची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत विविध विद्यापीठातील नामांकित विचारवंतांनी या परिषदेचे अध्यक्ष पद भुषवून या परिषदेला व्यापक आणि निश्चित दिशा देण्याचं कार्य उत्तमरित्या केले आहे त्यांचे आपण खरेच ऋणी आहोत.

आजीवन सदस्य नोंदणी