स्थापना - औरंगाबाद दि. १६/०४/१९८३
नोंदणी क्रमांक. महाराष्ट्र/ २७-८३

अध्यक्षांचे मनोगत...

मनोगत

       मराठी समाजशास्त्र परिषद च्या सर्व प्राध्यापकांना सस्नेह नमस्कार, महाराष्ट्रातील समाजशास्त्राच्या प्राध्यपकांना एकत्र आणण्याचा उद्देशाने एप्रिल १९८३ मध्ये औरंगाबाद येथे मराठी समाजशास्त्र परिषदे ची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत विविध विद्यापीठातील नामांकित विचारवंतांनी या परिषदेचे अध्यक्ष पद भुषवून या परिषदेला व्यापक आणि निश्चित दिशा देण्याचं कार्य उत्तमरित्या केले आहे त्यांचे आपण खरेच ऋणी आहोत.

       गोगटे जोगळेकर महाविध्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अधिवेशनात आपण माझी अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मराठी समाजशास्त्र परिषदेच्या सर्व सदस्यांचा अत्यंत आभारी आहे. अध्यक्षपदाचा हा दोन वर्षांचा कार्यकाल परिषदेच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याशिवाय आणि जुन्या कार्यकारिणी सदस्यांच्या मार्गदर्शना शिवाय सुरळीत पार पडणे शक्य नाही. कार्यकारिणी वेळोवेळी सभा घेऊन परिषदेचे कार्य करेलच पण आपल्या सकारात्मक सुचनाही परिषदेसाठी दिशादर्शक यंत्रासारख्या ठरणार आहेत. परिषदेच्या सभेमध्ये घेतले जाणारे निर्णय आणि सूचना आपल्यापर्यंत वेबसाईटच्या माध्यमातून पोहचविल्या जातील.

       परिषदेचे हित लक्षात घेवून परिषदेचे सचिव डॉ. अशोक बोरकर, कोषाध्यक्ष डॉ. धनंजय सोनटक्के, आणि महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाचे कार्यकारिणीतील विद्यापीठ प्रतिनिधी सदस्य कार्य करण्यास बांधील राहतील याची अध्यक्ष या नात्याने मी ग्वाही देतो. आपणा सर्वांकडून सहकार्या ची अपेक्षा. धन्यवाद!

डॉ. राहुल भगत

अध्यक्ष